- सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना अद्याप एकदाही प्रवेश नाही
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीची गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत सुमारे ९ हजार विद्यार्थ्यांना अर्ज करूनही प्रवेश मिळू शकलेला नाही. यात सुमारे पाच हजार असे विद्यार्थी आहेत, की ज्यांचे आत्तापर्यंत एकाही यादीत नाव जाहीर झालेले नाही. प्रवेश फेरीत सहभागी होता न आलेले हजारो विद्यार्थी पुढील फेरीच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा ही प्रक्रिया २० दिवस लांबणीवर गेल्यामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकही कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
अकरावीच्या चार नियमित फेऱ्यांनंतरही ३२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अगदी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनुसार प्रवेश समितीने विशेष प्रवेश फेरीचे आयोजन केले. मात्र या फेरीतही परिस्थितीत फारसा बदल घडला नाही. या फेरीची प्रवेश यादी शनिवारी जाहीर झाली असून अनेक विद्यार्थी निराश झाले आहेत. अल्पसंख्याक कोटा, संस्थांतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा यातील रिक्त जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी समर्पित करण्याची मुभा देण्यात आल्याने या फेरीसाठीच्या रिक्त जागा काहीशा वाढल्या. मात्र प्रवेशपात्रता गुण चढेच राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना फारसा फायदा झाला नाही. विशेष फेरीसाठी अर्ज केलेल्या साधारण ९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. या फेरीतही कॉमर्स शाखेत प्रवेश मिळवण्याची रस्सीखेच कायम राहिली आहे.
आता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीत मिळालेल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २१ ऑगस्टपर्यंत आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. उर्वरित प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या फेरीत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
विशेष फेरीसाठी ४७ हजार ५७६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३८ हजार ५६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, त्यातील १८ हजार ६९९ विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्यक्रम असलेले कॉलेज मिळाले आहे.
- शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती
वेळापत्रक कोलमडणार
अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा सुमारे २० दिवस लांबणीवर पडल्यामुळे अकरावीचे वेळापत्रक कोलमडणार आहे. सामान्यत: दरवर्षी ऑगस्ट अखेरीस पहिली चाचणी परीक्षा होते. मात्र यंदा प्रवेश प्रक्रियाच अद्याप पूर्ण झालेली नाही. यावर्षी सरकारने कॉलेजांमध्ये ७० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यावर कॉलेज सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र उर्वरित विद्यार्थी नंतर प्रवेशित झाल्यावर या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे काय? जरी अतिरिक्त वर्ग घेतले तरी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याशिवाय परीक्षा घेता येणार नाही. यामुळे ज्युनिअर कॉलेजांचे अकरावीचे वेळापत्रक कोलमडणार असल्याचे मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडिज यांनी सांगितले. उर्वरित कालावधीत अकरावीसाठी आवश्यक शैक्षणिक दिवस पूर्ण होऊ शकणार नाहीत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. तर, यंदा पहिले सत्र ५ नोव्हेंबरपर्यंत असल्यामुळे पुढे काही दिवस जास्तीचे मिळण्याची शक्यता असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.
विशेष प्रवेश फेरीची स्थिती
- पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी : १८, ६९९
- दुसऱ्या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी : ७,३३३
- तिसऱ्या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी : ४,२१०
- चौथ्या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी : २,७३५
- पाचव्या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी : १,९८४
READ | Tips to crack JEE
Also Read : List Of Foreign Medical Institutions/Universities For MBBS
For all latest Govt Jobs 2018, Railway Jobs, Bank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected
http://fyjc.vidyarthimitra.org
| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अकरावी प्रवेशासाठी खेळाडूंना कोटा
FYJC 2018 Admissions Analysis
Around 27,000 FYJC seats are vacant
अकरावी प्रवेशासाठी आणखी एक संधी?
अकरावी प्रवेशासाठी उद्यापासून अंतिम फेरी
Last round of FYJC admissions begins