11th Admissions 2019-20

11th Admissions 2019-20

अकरावी प्रवेश सूचना

PUBLISH DATE 6th July 2018

अकरावी प्रवेश सूचना

- विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज मिळाले हे पाहण्यासाठी https://pune.11thadmission.net वेबसाइटवर जाऊन आयडी आणि पासवर्ड टाकावा.

- प्राधान्यक्रमाच्या अर्जात पहिला पसंतीक्रम दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेजात विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला असल्यास त्यांनी कॉलेजात आपली मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती वेळापत्रकाप्रमाणे विहित मुदतीत सादर करणे आणि शुल्क भरून प्रवेश घेणे अनिवार्य राहील. प्रवेळ न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे तिसऱ्या फेरीसाठी प्रतिबंधित (ब्लॉक) करण्यात येतील.

- पहिल्या पसंती क्रमाव्यतिरिक्त अन्य पसंती क्रमांकाचे २ ते १० उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेज मिळाल्यास आणि ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास त्यांनी निर्धारित कालावधीत संबंधित कॉलेजात आपला प्रवेश निश्चित करावा. आपली मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती सादर करून पूर्ण शुल्क भरून प्रवेश निश्चित करू शकतील. अशा प्रवेशित विद्यार्थ्यांची नावे पुढील फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येतील.

- पसंतीक्रम २ ते १० पैकी कोणत्याही पसंती क्रमांकाचे मिळालेले कॉलेज मान्य नसल्यास त्यांनी दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी. तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश घेणे किंवा कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश रद्द करणे, अशा कोणत्याच कार्यवाहीची आवश्यकता नाही. निर्धारित कालावधीत विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेरीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात येईल. असे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर होणार नाही. मात्र, प्रवेश घेऊन रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्लॉक करण्यात येईल.

- प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुढच्या फेरीची वाट पाहावी.

- प्रवेश मिळालेल्या उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेजात प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची ज्युनियर कॉलेजात प्रवेश समितीद्वारे पडताळणी केली जाईल. अशा पडताळणीमध्ये कोणतेही कागदपत्रे किंवा विद्यार्थ्यांचा दावा (उदा. वैधानिक किंवा विशेष आरक्षण इत्यादी) अयोग्य आढळल्यास विद्यार्थाला प्रवेश नाकारला जाऊ शकतो याची नोंद घेणे आवश्यक आहे.

- अर्जदाराने पूर्ण शुल्क भरून प्रवेश घेतल्यानंतर त्याला संगणकीकृत प्रवेश पावती संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेजांकडून वेळापत्रकाप्रमाणे देण्यात येईल.

.........

महत्त्वाचे

..........

- जिल्ह्याबाहेरील जे विद्यार्थी सीबीएसई, आयसीएसई, आयबी, एनआयओएस, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळातून शालांत परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मूळ दहावी उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी

यांची प्रतीस्वाक्षरी घेणे आवश्यक आहे. तसेच, दाखल्यावर संबंधित शाळेचा यू-डायस क्रमांक असणे अनिवार्य आहे.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही मंडळातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला योग्यता प्रमाणपत्रासाठी संबंधित कॉलेजात उपलब्ध असलेला अर्ज भरावा लागेल व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.

................

प्रवेश घेताना सादर करावयाची कागदपत्रे

..............

खुल्या प्रवर्गासाठी

१) मूळ गुणपत्रक

२) शाळा सोडल्याचा मूळ दाखला

.......

आरक्षणातून प्रवेश घेणे

.....

१) मूळ गुणपत्रक

२) शाळा सोडल्याच मूळ दाखला

३) जातीचा मूळ दाखला

.............

विशेष आरक्षणासाठी

.....

१) मूळ गुणपत्रक

२) शाळा सोडल्याच मूळ दाखला

३) विशेष आरक्षणाचे प्रमाणपत्र

.......

यादीनुसार प्रवेश : ६ ते ९ जुलै

रिक्त जागांचा तपशील आणि कट ऑफ गुण प्रसिद्ध : १० जुलै

भाग १ आणि २ भरण्यासाठी उपलब्ध : १० ते ११ जुलै

दुसरी नियमित गुणवत्ता यादी : १३ जुलै

यादीनुसार प्रवेश : १४ ते १६ जुलै

रिक्त जागा जाहीर : १७ जुलै

भाग १ आणि २ भरणे : १८ ते १९ जुलै

तिसरी गुणवत्ता यादी : २३ जुलै

यादीनुसार प्रवेश घेणे : २४ ते २५ जुलै

रिक्त जागा आणि तिसऱ्या यादीतील कट ऑफ जाहीर : २६ जुलै

भाग १ आणि २ भरणे : २६ ते २७ जुलै

चौथी गुणवत्ता यादी जाहीर : २९ जुलै

यादीनुसार प्रवेश घेणे : ३० ते ३१ जुलै

 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी