DTE Admissions 2019-20

DTE Admissions 2019-20

फार्मसीला २० जूनपर्यंत; अभियांत्रिकीच्या प्रवेशाला २१ तारखेपर्यंत मुदतवाढ

PUBLISH DATE 20th June 2018

प्रवेशासाठी चुरस; फार्मसीच्या १२०० जागांसाठी आले १२ हजारांहून अधिक अर्ज 

अभियांत्रिकीच्या २ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता 
औरंगाबाद : दरम्यान, विभागातील ३२ अभियांत्रिकी महाविद्यालयात सुमारे १२ हजार जागा आहेत. त्यासाठी १० हजार अर्ज आले आहेत. यामुळे अभियांत्रिकीच्या २ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. तर फार्मसीच्या १२०० जागांसाठी १२ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. फार्मसीसाठी दहा पट अधिक अर्ज आल्याने येथे प्रवेशासाठी खरी स्पर्धा होणार आहे. दरम्यान, फार्मसी प्रवेशासाठी २० जूनपर्यंत तर अभियांत्रिकीच्या प्रवेशाला २१ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंगळवारी (१९ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास डीटीइच्या संकेतस्थळावर ही माहिती अपडेट करण्यात आली. 

विभागातील अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेशासाठी मंगळवारी रात्री ९ पर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. यंदा अभियांत्रिकीपेक्षा फार्मसीच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांच्या ओढा असून प्राथमिक आकडेवारीप्रमाणे उपलब्ध जागेपेक्षा दहापट अधिक अर्ज आले आहेत. 
अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेशासाठी मंगळवार (१९ जून) हा अर्ज स्वीकारण्याचा अखेरचा दिवस होता. यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. या अर्जाची प्रिंटआऊट काढून यातील माहितीची शहनिशा करण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी महाविद्यालयांत सुविधा केंद्र सुरू करण्यात आले होते. येथे अर्ज तपासल्यावर या केंद्रांवरच जमा करावे लागतात. त्यातून मेरीट लिस्ट लावली जाईल. मंगळवारी अखेरचा दिवस असल्याने दिवसभर सर्वच महाविद्यालयात गर्दी होती. रात्री ९ पर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. 

 

इ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

बऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.

त्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.

या करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.

त्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

 

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)