11th Admissions 2020-21

11th Admissions 2020-21

इ ११ वी कॅप राउंड 3 चा कट ऑफ कॅप राउंड ४ चा फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध

PUBLISH DATE 1st August 2018

इ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018 CAP ROUND 1, 2 & 3 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर विनामूल्य उपलब्ध आहे.

2018 CAP ROUND 1, 2 & 3  http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

'केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील २८५ ज्युनियर कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या प्रवेशाच्या यादीत १७ हजार १५२ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. प्राधान्यक्रमाच्या अर्जात पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज पाच हजार ७४६ विद्यार्थ्यांना मिळाले असून, त्यांना २ ऑगस्टपर्यत प्रवेश घेणे अनिवार्य आहे,' अशी माहिती समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी राऊत यांनी मंगळवारी दिली.

तिसऱ्या यादीतून प्रवेश देण्यात आलेले विद्यार्थी

१७ हजार १५२

प्रवेश घेण्यासाठी मुदत

२ ऑगस्ट, सायं. ५ वाजेपर्यंत.

तिसऱ्या फेरीतून पहिल्या दिवशी झालेले प्रवेश

१८१८

पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी

५ हजार ७४६

या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य.

केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत उपलब्ध जागा

(कला, वाणिज्य, विज्ञान आणि अन्य शाखा)

९६ हजार ३२०

प्रवेशासाठी आलेले अर्ज

७५ हजार ९३९

.

विद्यार्थ्यांसाठी कॉल सेंटर सुरू

अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच औंधमध्ये कॉल सेंटर सुरू झाले आहे. यासाठी नोएडाच्या न्यासा कम्युनिकेशन या कंपनीची निवड करण्यात आली होती. मात्र, प्रवेशाची तिसरी फेरी सुरू होईपर्यंत या कॉल सेंटरला मुहूर्त मिळाला नव्हता. आत या कॉल सेंटरचे काम मंगळवारी सुरू झाले आहे. पुढील दोन महिने साधारण हे सेंटर सुरू राहणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. या कॉल सेंटरमध्ये ३० जण कार्यरत असून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये या कॉल सेंटरचे कामकाज चालणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी समस्या सोडविण्यासाठी ०२०-६७४८५५५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

READ | These tips will help NEET repeaters to secure a seat next year

READ | Tips to crack JEE

Also Read : List Of Foreign Medical Institutions/Universities For MBBS

For all latest Govt Jobs 2018Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org