DTE Admissions 2019-20

DTE Admissions 2019-20

इंजिनिअरिंग प्रवेशात 'फ्रीझ' पर्याय

PUBLISH DATE 30th June 2018

इंजिनिअरिंग प्रवेशात 'फ्रीझ' पर्याय गरजेचा 

फ्रीझ न केल्यास प्रवेशात येणार अडचणी 

इंजिनिअरिंगच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थ्याने फेरीतील प्रवेश निश्चित करताना त्या प्रवेशासाठी संमती दर्शवत ऑप्शन फ्रीझ करणे आवश्यक आहे. तसे न केल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत आहेत. 
इंजिनिअरिंगच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आधी फ्रीझ, स्लाइड आणि फ्लोट असे तीन ऑप्शन्स होते. आता त्यात बदल करण्यात आला असून अर्ज भरल्यावर प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू होते. त्या वेळी जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याने दिलेल्या ऑप्शननुसार महाविद्यालय व शाखा मिळाली तर प्रवेश निश्चित करण्यासाठी फ्रीझ ऑप्शन निवडणे आवश्यक आहे. हवी ती शाखा मिळाली नसल्यास फ्रीझऐवजी 'नो' पर्याय निवडला तरच दुसऱ्या फेरीसाठी सहभागी होता येईल. ही बाब लक्षात न आल्याने काही विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले. त्यामुळे काळजीपूर्वक प्रवेश करा, अशा सूचनाही अधिकाऱ्यांनी दिल्या. 

 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

इ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

बऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.

त्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.

या करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.

 

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |