मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सोमवारपासून (ता.२५) ऑनलाइनअर्ज भरता येणार आहे. १२ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून कागदपत्रे अपलोडसह अर्जाची पडताळणी करायची आहे.
राज्यातील महाविद्यालयांमध्ये एमसीएला प्रवेश घेण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. यातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. प्राथमिक गुणवत्ता यादी १३ जुलै रोजी जाहीर होईल. या यादीवर १४ ते १६ जुलैदरम्यान आक्षेप घेता येतील. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी जाहीर होईल.
सरकारी आणि खासगी महाविद्यालयांतील अभ्यासक्रमाच्या रिक्त जागा १७ जुलै रोजी जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रवेशप्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mahacet.org आणि www.dtemaharashtra.gov.in संकेतस्थळावर संपर्क साधावा.
प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
अर्ज, कागदपत्रे अपलोड, पडताळणी, कन्फर्मेशन मुदत : १२ जुलै
जात वैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारणे : १२ जुलै
प्राथमिक गुणवत्ता यादी : १३ जुलै
गुणवत्ता यादीवरील आक्षेप : १४ ते १६ जुलै
जातवैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख : १६ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी : १७ जुलै
रिक्त जागा जाहीर करणार : २७ जुलै
महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : १८ ते २० जुलै
प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणे : २१जुलै
एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्चित करणे : २२ ते २४ जुलै
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे : २५ जुलै
महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : २६ ते २८ जुलै
प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर : २९ जुलै
एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्चित करणे : ३० जुलै ते १ ऑगस्ट
तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर : २ ऑगस्ट
महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे : ३ ते ५ ऑगस्ट
प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर : ६ ऑगस्ट
एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्चित करणे : ७ ते ९ ऑगस्ट
अतिरिक्त फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे : १२ ऑगस्ट
महाविद्यालयांसाठी प्राधान्य अर्ज भरणे : १३ ते १४ ऑगस्ट
प्रवेशाची गुणवत्ता जाहीर होणे : १६ ऑगस्ट
महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेणे : १७ ते १९ ऑगस्ट
शैक्षणिक वर्षाला सुरुवात : १ ऑगस्ट
प्रवेशाचा कट ऑफ दिनांक : २५ ऑगस्ट
कॉलेजांना डेटा अपलोड करणे : २६ ऑगस्ट
११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.
त्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर उपलब्ध आहे.
http://fyjc.vidyarthimitra.org/
| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
Admission to engg, hotel mgmt & pharma till Aug 31
MH- DSE Cut offs CAP Round I - 2019
Direct 2nd Yr Engg 2019: Allotment of CAP Round I
BE/BPharm admission process extended due to heavy rains
MH DSE Admission 2019, Final Merit List Release Postponed
CSAB NIT registrations begin under special round