DTE Admissions 2019-20

DTE Admissions 2019-20

पॉलिटेक्निक डिप्लोमा : प्रवेश सुरू

PUBLISH DATE 22nd June 2018

पॉलिटेक्निक डिप्लोमा : प्रवेश सुरू; यंदा माहितीपुस्तिका, किट विक्री बंद 

पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन | पहिली फेरी २७ जुलैपासून; कट आॅफ २८ ऑगस्टला जाहीर 

राज्य तंत्रशिक्षण विभाग आणि सर्व सामायिक प्रवेश पूर्व परीक्षा सेल यांच्या वतीने दहावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गुरुवारपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदापासून माहिती पुस्तिका आणि किटची विक्री बंद करण्यात आली असून, माहितीपुस्तिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी डॉ. गोविंद संगवई यांनी दिली. 


दहावी-बारावी आणि अन्य प्रवेश पूर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. दहावी- बारावीनंतर अनेक विद्यार्थी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची निवड करतात. अशा विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस गुरुवारपासून सुरुवात झाली. ऑनलाइन नोंदणीसाठी खुल्या प्रवर्गास ४०० रुपये, राखीव प्रवर्गासाठी ३०० रुपये शुल्क आकारले जात आहे. विद्यार्थ्यांनी dtemaharashtr.gov.in या संकेतस्थळावरील पोस्ट एसएससी पॉलिटेक्निक या लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्रथम वर्ष पॉलिटेक्निकची माहितीपुस्तिका दिसेल. येथे विद्यार्थ्यांनी नाव, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर क्रमांक नोंदवायचा आहे. तसेच लॉग इनसाठी पासवर्डही तयार करायचा आहे. यानंतर यानंतर अॅप्लिकेशन आयडी मोबाइलवर येईल. नोंदणीसाठी दिलेला मोबाइल क्रमांक किमान दोन महिने बदलू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. मोबाइलवर आलेल्या क्रमांकावर लॉगिन करून रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण होताच इतर माहिती द्यायची आहे. सर्व फेऱ्या होईपर्यंतच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी एक हजार रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. यात अर्जासोबत फोटो, कागदपत्रे, स्वाक्षरी अपलोड करायची आहे. खुल्या गटासाठी नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमेसाइल, नसेल तर टीसीवर भारतीय आणि महाराष्ट्रीयन असल्याचा उल्लेख आवश्यक आहे. दहावी - बारावीचे गुणपत्रकही जोडायचे आहे. राखीव गटासाठी जात पडताळणी, व्हीजेएनटी, व्हीजेएनटी वन, टू, थ्री, ओबीसी, एसबीसी प्रवर्गासाठीही नॉनक्रीमिलेअर आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के जागा राखीव असून त्यांना ट्यूशन फी माफ केली जाणार आहे, मात्र त्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. 


सुविधा केंद्रातूनच भरा अर्ज : विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना काळजी घ्यावी. सर्व पॉलिटेक्निकमध्ये सुविधा केंद्र देण्यात आले आहेत, त्याचा उपयोग करावा. आपला पासवर्ड कुणाला देऊ नका. अर्ज नेट कॅफे अथवा ज्यांची माहिती नाही, अशांकडून भरू नका. अर्ज भरल्यावर प्रिंट काढून वाचून घ्या, अशा सूचनाही तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. 
वेळापत्रक असे : http://poly18.dtemaharashtra.org/poly2018 या संकेतस्थळावर सविस्तर माहिती 


प्रवेश प्रक्रियेस सुरुवात 
२१ जून ते १६ जुलै : ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज निश्चिती 
१७ जुलै : ऑनलाइन जाहीर होईल गुणवत्ता यादी 
१८ ते २० जुलै : अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी मुदत 
२० जुलै : जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत 
(पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीचे ऑप्शन फ्रीझ केल्यास थेट संस्थेत जाऊन प्रवेश २७ ते १९ ऑगस्टपर्यंत करता येईल. दुसऱ्या फेरीत फ्रीझ केले तर ५ ते १९ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. तिसऱ्या फेरीत जे मिळेल त्या ठिकाणी १४ ते १९ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चिती करता येईल.) 
२१ जुलै : अंतिम गुणवत्ता यादी, पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील समजेल 
२२ ते २५ जुलै : पहिल्या फेरीचे ऑप्शन फॉर्म भरता येतील 
२६ जुलै : पहिल्या फेरीसाठी जागांचे वाटप 
२७ ते ३० जुलै : पहिल्या फेरीतील प्रवेश 

पहिली फेरी 
८ ऑगस्ट : तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल 
९ ते १२ ऑगस्ट : ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया 
१३ ऑगस्ट : तिसऱ्या फेरीसाठी जागांचे वाटप 
१४ ते १७ ऑगस्ट : तिसऱ्या फेरीतील प्रवेशाला प्रारंभ 
३१ जुलै : दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल 
१ ते ३ ऑगस्ट : ऑप्शन फॉर्म भरण्याचा अवधी 
४ ऑगस्ट : दुसऱ्या फेरीसाठी जागा वाटप 
५ ते ७ ऑगस्ट : दुसऱ्या फेरीतील प्रवेशास सुरुवात 


दुसरी फेरी 
दुसरी फेरी 

२० ऑगस्ट : विशेष फेरीसाठी तपशील जाहीर होईल 
२३ ऑगस्ट : या फेरीचे जागा वाटप 
२४ ते २५ ऑगस्ट : या फेरीतील प्रवेश 
२८ ऑगस्ट : कटऑफ जाहीर होईल 
८ ऑगस्ट : कॉलेजांना सुरुवात 

 

 

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.

त्याचबरोबर इंजिनीरिंग व फार्मसीला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस यादी एका क्लिकवर गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात, कोणत्या युनिवर्सिटी अॅडमिशन पाहिजे, त्याचबरोबर प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम अशा अनेक ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने http://vidyarthimitra.org/rank_predictor या पोर्टलवर  उपलब्ध आहे.

 

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org/

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |