DTE Admissions 2020-21

DTE Admissions 2020-21

एमएचटी-सीईटी ऑनलाइन घेण्याचा प्रस्ताव

PUBLISH DATE 24th October 2018

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी ‘एमएचटी-सीईटी २०१९’ ही सामाईक प्रवेश परीक्षा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यासाठी विद्यार्थी, तज्ज्ञ, नागरिक यांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत.राज्यातील कॉलेजांमध्ये प्रथम वर्ष इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र, कृषीच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी होणारी एमएचटी-सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा यंदा ऑनलाइन घेण्याचे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रस्तावित केले आहे. साधारण मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या या परीक्षेचा कालावधी १६ ते २० दिवसांचा राहणार असल्याचे सीईटी सेलने प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात सीईटी ऑनलाइन पद्धतीने होण्य़ाची शक्यता आहे. 

यापूर्वी सीईटी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येत होती. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ती ऑनलाइन घेण्याचा विचार सीईटी सेलकडून करण्यात येत आहे. 

सीईटी ऑनलाइन घेण्याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षकतज्ज्ञ यांच्याकडून प्रतिक्रिया मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी सीईटी सेलने http://www.mahacet.org या वेबसाइटवर माहितीसह दहा प्रश्नांची प्रश्नावली प्रसिद्ध केली आहे. ही प्रश्नावली विद्यार्थी, पालक, शिक्षकतज्ज्ञ यांना १५ नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहे, असे सीईटी सेलने सांगितले आहे. सीईटी ऑनलाइन घेण्याबाबत राज्य सरकारचीदेखील चाचपणी सुरू होती. त्यामुळे सीईटी सेलच्या पुढाकाराने ही परीक्षा ऑनलाइन होण्याला मुहूर्त मिळाला आहे. 

देशात आणि राज्यात विविध प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होतात. त्यानुसार राज्य सरकारचादेखील ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आग्रह होता. परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत चाचपणी सुरू असून, विद्यार्थी, पालक, शिक्षकतज्ज्ञ यांच्याकडून प्रतिक्रिया मागविण्यात आल्या आहेत. सीईटी ऑनलाइन झाल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीचे ठिकाण, तारीख आणि वेळ निवडता येईल. याचा विद्यार्थ्यांना फायदाच होईल. 

- आनंद रायते, आयुक्त, सीईटी सेल 

ऑनलाइन का? 

- राज्याची सीईटी सध्या पेन-पेपर पद्धतीने होते. 

- इंजिनीअरिंग प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर होणारी जेईई-मेन ऑनलाइन आणि ऑफलाइनही घेण्यात येते. 

- पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अनेक प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होतात. 

- विद्यार्थ्यांना त्यांना सोयीच्या तारखेला, सोयीच्या ठिकाणी आणि सोयीच्या वेळी परीक्षा देणे शक्य. 

- ऑनलाइनबाबतच्या सूचनांसाठी वेबसाइट : http://www.mahacet.org 

Upcoming Entrance Exams Details  2019-20

JEE MAIN 2019

CAT

Exam date:25 Nov 2018

Last date of Application: 19 Sept 2018

https://goo.gl/A625Sk

MAT

Exam date: 02 Sept 2018

Last date of Application: 24 Aug, 2018,

https://goo.gl/xhja4j

GATE

Exam date: 02nd Feb 2019

Last date of Application: 21st Sept 2018

https://goo.gl/r4BX1g

SIAC-CET

Exam date: 4 Nov 2018

Last date of Application: 14 Sept 2018

https://goo.gl/gr3fLV

CDS

Exam date:18 Nov 2018

Last date of Application: 3 Sept 2018

https://goo.gl/s4BsfE

NSTSE

Exam date:16 Dec 2018

Last date of Application:1 Aug 2018

https://goo.gl/SDCYMy

XAT

Management

Exam date:6 Jane 2019

Last date of Application: 30 Nov 2018

https://goo.gl/Jz2Gyb

JEE MAIN

Engineering

Exam date:6 Jan 2018

Last date of Application:30 Sept 2018

https://goo.gl/gBdyF8

CTET

Teacher Education

Exam date:  16th Sept. 2018