Scholarships

Scholarships

पुणे महानगरपालिका शैक्षणिक अर्थसहाय्य योजना

PUBLISH DATE 11th June 2019

​पुणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षी १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या योजनांतर्गत शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येते.

 विद्यार्थ्यांनी dbt.punecorporation.org या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरावा. ऑनलाईन भरलेल्या अर्जांची प्रिंट आऊट आणि सोबत आवश्यक त्या कागदपत्रांसहित आपल्या जवळच्या क्षेत्रिय कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी  या वेळेत स्विकारले जातील. जाणार आहेत.

काय आहे योजना? किती मिळणार मदत?
दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यासाठी महानगरपालिकेच्या या दोन योजना आहेत. दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये) रुपयांची मदत देणारी भारतरत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना असून बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) रुपयोंची मदत करणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना आहे.
 

​योजनेसाठीची पात्रता

 • योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.
   
 • या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला फेब्रुवारी-मार्च २०१८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण आवश्यक.
 • पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला किमान ७० टक्के गुण आवश्यक.
   
 • योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थी/विद्यार्थीनीला दहावी किंवा बारावीमध्ये किमान ६५ टक्के गुण असणे आवश्यक.
   
 • योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनीने दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थत प्रवेश घेतलेला असावा.

Apply Online :http://dbt.punecorporation.org

कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

इ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018-19 CAP ROUND 1, 2 & 3 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org पोर्टलवर तसेच https://goo.gl/rT2vXd या मोबाईल अॅॅप वर विनामूल्य उपलब्ध आहे.

2018 CAP ROUND 1, 2, 3 & 4  http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

OR

Download App Now : Cut-offs 2019

India's Leading Educational Web Portal now available on Google play store                 https://goo.gl/HbsLr2
Check FYJC & ALL COURSES UNDER DTE & DMER - Previous & Current Year Cutoff |  http://vidyarthimitra.org/rank_predictor9

मागासवर्गीय कल्याण योजना

पुणे महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजना खालीलप्रमाणे- 

१. मागासवर्गीय लोकांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण 
१८ ते ४५ वयोगटातील तरुण-तरुणींना मोफत प्रशिक्षण दिले जाते व प्रशिक्षण काळात मासिक बस पास दिला जातो.

२. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांन सायकली 
इयत्ता अकरावी तसेच त्यापुढील वर्गात मान्यताप्राप्त कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अगोदरचे परिक्षेमध्ये ५० टक्के गुण मिळाले असल्यास तसेच घरापासून महाविद्यालयाचे अंतर २ किलोमीटरपेक्षा जास्त असल्यास सायकल दिली जाते.

३. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाते. याकरिता विद्यार्थ्यांनी दररोज २ तास सामाजिक उपक्रमात काम करणे अपेक्षित आहे.

४. घाणभत्ता घेणाऱ्या मनपा सेवकांच्या मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी अर्थसहाय्य देणे
मनपा कर्मचारी ज्यांना घाणभत्ता मिळतो अशा सेवकांच्या माध्यमिक शिक्षण घेत असणाऱ्या जास्तीत जास्त दोन मुलांसाठी शैक्षणिक साहित्यासाठी प्रत्येकी ५००० रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

५. पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मागणीप्रमाणे उपलब्ध करुन दिले जाते.

६. अभ्यासिका
इयत्ता ५ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली शालेय वेळेनंतर अभ्यासिकेची सोय केली जाते. शिक्षकांना दरमहा २,००० रुपये मानधन दिले जाते. अभ्यासिकेत आवश्यक ते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिले जाते.

७. गुणवत्ता वाढ 
इयत्त नववीत ५० टक्के गुण मिळवणाऱ्या व वाल्मिकी समाजातील ४५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीसाठी खासगी क्लाससाठी ५००० रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

८. ग्रंथालय
शहरातील ३ ठिकाणी ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. येथे विद्यार्थ्यांना १०० रुपये डिपॉझिटट घेऊन दर्जेदार पुस्तके उपलब्ध करुन दिली जातात. ग्रंथालयाला मासिक शुल्क नाही. 
- हुतात्मा स्मारक, आर.टी.ओ. ऑफिस समोर, येरवडा, पुणे -०६
- संत ज्ञानेश्वर समाज मंदिर, भवानी पेठ, पुणे - ४२
- कुसाळकर अभ्यासिका, कुसाळकर पुतळ्यासमोर, गोखलेनगर, पुणे- १६

९. १८ ते ४५ वयोगटातील बेरोजगारांना विविध व्यवसायाची संधी आणि प्रशिक्षणाची संधी याबाबत उद्योजकता शिबिराबाबत मार्गदर्शन केले जाते.

१०. मागासवर्गीय १८ ते ४५ वयोगटातील महिला व पुरुषांना स्वयंरोजगारासाठी १०,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.


११. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना (इ. १० वी)
इयत्ता दहावीत ७० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी वर्षभरात केलेल्या खर्चासाठी जास्तीत जास्त १५००० रुपये अनुदान दिले जाते.

१२. डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना (इ. १२ वी) 
इयत्ता बारावीत किमान ७० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर शिक्षणासाठी केलेल्या खर्चापोटी २५००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.

१३. १२ वी खासगी क्लाससाठी अर्थसहाय्य
इयत्ता अकरावीत ६० टक्के गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना बारावीच्या खासगी क्लाससाठी १०,००० रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

१४. इयत्ता १२ वीसाठी सीईटीसाठी अर्थसहाय्य
जे विद्यार्थी सीईटी परीक्षेला बसतात अशा विद्यार्थ्यांना सीईटीच्या तयारीसाठी १०,००० रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. (टिपः अ.क्र. १३ किंवा अ.क्र. १४ पैकी एका योजनेचा लाभ घेता येईल)

१५. उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य
जे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेत असतील व मागील परीक्षेत ६० टक्के गुण मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाते. उदा. कॉम्प्युटर सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंग इत्यादी. त्यांच्या प्रशिक्षण काळात सतत उत्तीर्ण झाल्यास दरवर्षी १०,००० रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

१६. व्यसनमुक्तीसाठी अर्थसहाय्य
१८ ते ४५ वयोगटातील युवक अंमली पदार्थाच्य आहारी गेल्यास त्यांना त्यापासून मुक्त करण्यासाठी शासनमान्य अथवा मान्यताप्राप्त व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी ७००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते.

१७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहाती विद्यार्थ्यांना जेवणासाठी होणारा खर्च पुणे महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत ५० टक्के खर्च मागासवर्गीय कल्याण निधीतून अनुदान म्हणून देण्यात येतो.

१८. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे
सन २०१०-११ पासून सदरची योजना कार्यान्वीत झाली असून पदवीधर मागासवर्गीय मुलांना एमपीएससी/युपीएससी परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळणे व सदर मुलांना स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणे हा योजनेचा उद्देश आहे. पुणे विद्यापीठामार्फत हे केंद्र चालविले जाते.

१९. वैयक्तिक नळ कनेक्शनसाठी अर्थसहाय्य
नळ कनेक्शनसाठी ५००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. (ही योजना क्षेत्रिय कार्यालयामार्फत राबविली जाते.)

२०. झोपडी दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य
झोपडी दुरुस्तीसाठी १०,००० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. (ही योजना क्षेत्रिय कार्यालयामार्फत राबविली जाते.)

२१. वीज कनेक्शनसाठी अर्थसहाय्य
मागासवर्गीय नागरिकांना त्यांच्या वीज कनेक्शनसाठी ५००० रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाते. (ही योजना क्षेत्रिय कार्यालयामार्फत राबविली जाते.)

२२. सुलभ शौचालय बांधण्यासाठी अर्थसहाय्य 
मागासवर्गीय नागरिकांना सुलभ शौचालय बांधण्यासाठी १५००० रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. (ही योजना क्षेत्रिय कार्यालयामार्फत राबविली जाते.)

 


योजनांविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधाः 
१)प्रभाग पातळीवरील समुह संघटिकांचे कार्यालय, पुणे 
२)तुमच्या जवळील क्षेत्रिय कार्यालय 
३)समाज विकास कार्यालय, एस.एम. जोशी हॉल, दारुवाला पूल, रास्ता पेठ, पुणे 
अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ०२०-२५५०१२८१/८२/८३/८४

इ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018-19 CAP ROUND 1, 2 & 3 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org पोर्टलवर तसेच https://goo.gl/rT2vXd या मोबाईल अॅॅप वर विनामूल्य उपलब्ध आहे.

2018 CAP ROUND 1, 2, 3 & 4  http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

OR

Download App Now : Cut-offs 2019

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------