RTE Admissions

RTE Admissions

आरटीई प्रवेश प्रक्रिया 2019-20

PUBLISH DATE 13th February 2019

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी आता विशेष समितीद्वारे करण्यात येणार आहे. संपूर्ण आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी केली जाणार नाही, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झाल्यानंतर पालक मुलांचे प्रवेश घेण्यासाठी शाळेत जातात. मात्र, तेथे त्यांना कागदपत्रांमध्ये त्रुटी दाखवित प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे आता कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये एकूण २० सदस्य राहणार असून ते कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. या पडताळणी समितीद्वारे निवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, आवश्यक असल्यास एसईबीसी प्रवर्गाचा दाखल्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार

Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act.

✅ ठळक मुद्दे

◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत

◼ कुठलेही शुल्क नाही !

◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.

◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.

◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.

◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी

R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश

 

R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)

येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-

 रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे

◆ आधार कार्ड
◆ पासपोर्ट
◆ निवडणुक ओळखपत्र 
◆ वीज बील
◆ घरपट्टी,  Tax पावती
◆  पाणीपट्टी 
◆ वाहन चालवण्याचा परवाना

◼ पाल्याचा जन्माचा दाखला

◼ पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो

◼ पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)

◼ एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)

ऑनलाईन पध्दतीने application करू शकता.

सन 2019-20 या वर्षीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध होतील. 

 

Click to View| Upcoming Entrance Exams

India's Leading Educational Web Portal now available on Google play store                 https://goo.gl/HbsLr2