Higher Education

Higher Education

एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना घेता येणार प्रवेश

PUBLISH DATE 23rd May 2020

देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. अलीकडेच झालेल्या एका बैठकीत विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाच वेळी दोन डिग्रीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.

आयोगाच्या या निर्णयानंतर आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करता येतील.मात्र, यासाठी काही नियमही बनविण्यात आले आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या गोष्टींची माहिती नुकतीच यूजीसीने जाहीर केली आहे.

यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, 'यूजीसीने हा निर्णय भारतीय विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे. आता विद्यार्थी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांचे दोन भिन्न पदवी अभ्यासक्रम करू शकतात. दोन्ही पदवी पूर्णपणए वैध असतील.

काय नियम आहेत?

यूजीसी सेक्रेटरींनी एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमांच्या काही नियमांची माहिती दिली आहे. ही सुविधा फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी असेल असे त्यांनी म्हटले आहे.

जर तुम्ही एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम शिकत असाल तर त्यापैकी फक्त एकच पदवी नियमित स्वरूपात असेल. दुसरा अभ्यासक्रम तुम्हाला ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग मोड (ओडीएल - ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग) वर करावा लागेल. तुम्ही कोणत्या कोर्सचा अभ्यास करू इच्छित आहात हा पूर्णपणे तुमचा निर्णय असेल.

या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना व नियमांची माहिती लवकरच अधिकृत अधिसूचनेसह प्रसिद्ध केली जाईल.

यूजीसीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गेल्या वर्षी या विषयावर प्रस्ताव ठेवला होता. यापूर्वी २०१२ मध्ये अशी समिती स्थापन केली गेली होती. पण त्यावेळी या योजनेस मंजुरी मिळाली नव्हती.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा