पाच जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पाच वर्षीय विधी (लॉ) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक ५ जुलै आहे. तर, प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २४ जुलैपर्यंत कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक गुणवत्ता यादी ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे, असे सीईटी सेलने सांगितले आहे.
सीईटी सेलने राज्यातील लॉ कॉलेजांमध्ये पाच वर्षीय इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले होते. सीईटीत मिळालेल्या गुणांच्या आधारे ही प्रवेश प्रक्रिया पार पडेल. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहे. प्रवेश प्रक्रियेत वेबसाइटहून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणि वेबसाइटवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ५ जुलै आहे. प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजीपर्यंत चर्चगेटच्या शासकीय लॉ कॉलेजमध्ये कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी आणि प्रवेश प्रक्रियेतील काही गोष्टींबाबत आक्षेप असल्यास त्यांना १७ ते २० जुलै दरम्यान घ्यायचा आहे. त्यानंतर प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलै रोजी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mah-llb5admission.in या वेबसाइटवर संपर्क साधावा. दरम्यान, कॉलेजांमध्ये प्रवेश निश्चित करण्याचे वेळापत्रक आणि प्रत्यक्ष प्रवेश घेण्याचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करणे - ५ जुलै
प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणे - ९ जुलै
प्रवेश प्रक्रियेत आक्षेप नोंदविणे - १७ ते २० जुलै
प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित - २४ जुलै
| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
MH CET LLB (3 years) result 2019 declared
CLAT Result 2019 will be announced today
CLAT 2019: Check question paper analysis.
CLAT admit card 2019 to release today
AILET 2019: Check paper analysis
MHT CET 2019 Law entrance exams: expert’s analysis