DTE Admissions 2019-20

DTE Admissions 2019-20

थेट द्वितीय वर्ष डिप्लोमाला प्रवेश

PUBLISH DATE 28th June 2018

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बारावी आणि आयटीआय (दहावीनंतर) अभ्यासक्रमानंतर इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवेश घेण्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी १२ जुलैपर्यंत वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना १२ जुलैपर्यंत कागदपत्रे अपलोड करायचे असून, त्याच्यासोबत अर्जाची पडताळणी आणि कन्फर्मेशन करता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलतर्फे देण्यात आली आहे.

राज्यातील इंजिनीअरिंग डिप्लोमा कॉलेजांमध्ये थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात 

येत आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या आधारे पदवीधर विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहे. सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १२ जुलैपर्यंत वेबसाइटहून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून कन्फर्मेशन करायचे आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी १३ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीवर आक्षेप १४ ते १६ जुलै या कालावधीत घेता येणार आहे. तर, अंतिम गुणवत्ता यादी १७ जुलै रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. सरकारी आणि खासगी कॉलेजांमधील अभ्यासक्रमाच्या रिक्त जागा १७ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल, असे सीईटी सेलने सांगितले आहे. या रिक्त जागांनुसार विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलै दरम्यान ऑनलाइन अर्जात कॉलेजांचे प्राधान्य क्रम भरता येणार आहे. त्यानुसार पहिली प्रवेशाची यादी २२ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

माहिती वेबसाइटवर उपलब्ध

वेबसाइटहून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ३०० रुपये; तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४०० रुपये शुल्क आहे. विद्यार्थ्यांना क्रेडिट, डेबिट, नेट बँकिंगद्वारे शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती, अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची पात्रता, नियमावली www.mahacet.org आणि http://www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेशांची निश्चिती ही जवळच्या एआरसी सेंटरवर करायची आहे

सविस्तर वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची पडताळणी व कन्फर्मेशन - १२ जुलै

जात वैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्विकारणे - १२ जुलै

प्राथमिक गुणवत्ता यादी - १३ जुलै

गुणवत्ता यादीवर आक्षेप - १४ ते १६ जुलै

जात वैधता प्रमाणपत्र, जमाती पडताळणी प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख - १६ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी - १७ जुलै

रिक्त जागा जाहीर करणे - २७ जुलै

कॉलेजांचे प्राधान्यक्रम भरणे - १८ ते २१ जुलै

प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर - २२ जुलै

एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्चित करणे - २३ ते २६ जुलै

दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर - २७ जुलै

कॉलेजांचे प्राधान्यक्रम भरणे - २८ ते ३१ जुलै

प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर - १ ऑगस्ट

एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्चित करणे - २ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट

तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर - ५ ऑगस्ट

कॉलेजांचे प्राधान्यक्रम भरणे - ६ ते ९ ऑगस्ट

प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर - १० ऑगस्ट

एआरसी सेंटवर जाऊन प्रवेश निश्चित करणे - ११ ते १४ ऑगस्ट

अतिरिक्त प्रवेश फेरीसाठी कॉलेजांमधील रिक्त जागा जाहीर करणे - १८ ऑगस्ट

कॉलेजांसाठी प्राधान्य अर्ज भरणे - १९ ते २० ऑगस्ट

प्रवेशाची गुणवत्ता जाहीर होणे - २१ ऑगस्ट

कॉलेजांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रवेश करणे - २२ ते २३ ऑगस्ट

प्रवेशाचा कट ऑफ दिनांक - २८ ऑगस्ट

कॉलेजांना डेटा अपलोड करणे - ३० ऑगस्ट

 

इ. ११ वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

DTE इंजिनीरिंग व फार्मसीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

बऱ्याचदा विद्यार्थी हे कॉलेजेस व ब्रांचेसची निवड ही विचार न करता भरतात किंवा प्रचलित कॉलेजेस किंवा इनटनेट कॅफेच्या आधारे कॉलेजेस व ब्रांचेसला प्राधान्य क्रम किंवा पसंतीक्रम देतात त्यामुळे त्यांना पुढील १० वी नंतर विद्यार्थ्यांना २ वर्षे व १२ नंतर इंजिनीरिंगची ४ वर्षे मनस्ताप सहन करावा लागतो, याचा परिणाम पुढील प्लेसमेंट वर पण होतो.

त्यामुळे ११ वीचा (आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी) व १२ नंतर इंजिनीरिंग व फार्मसीचा ऑपशन फॉर्म हा विचारकरून काळजीपूर्वक भरायला हवा.

या करिता विद्यार्थी मित्र या शैक्षणिक वेबपोर्टलने अतिशय सोप्या पद्धतीने कट-ऑफ विनामूल्य एका क्लिकवर तुमचे मार्क व गुणवत्ता यादी क्रमांक, कास्ट कॅटेगरी, कोणत्या शहरात अॅडमीशन पाहिजे इ. अनेक बाबींना पडताळून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ११ वी (FYJC) प्रवेश करिता १ ते १० ज्यु. कॉलेजेसची यादी व १२ वी नंतर इंजिनीरिंग करिता अॅडमीशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजेस व कोर्सेसची ३०० पेक्षा ही जास्त ऑपशनची यादी उपलब्ध करून दिले जाते.

११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस व कट-ऑफची माहिती fyjc.vidyarthimitra.org या पोर्टलवर उपलब्ध आहे.