Film Courses Admissions

Film Courses Admissions

फिल्म स्कूलसाठी ‘आंतरराष्ट्रीय ग्रंथालय’

PUBLISH DATE 15th November 2017

पुणे : चित्रपट आणि दूरदर्शनसंबंधी अभ्यासक्रम शिकवल्या जाणाऱ्या जगभरातील सुमारे ७० फिल्म आणि टीव्ही स्कूलची वार्षिक परिषद नुकतीच झुरिक (स्वित्झर्लंड) येथे पार पडली. या परिषदेत पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एफटीआयआय) मांडलेला चित्रपट प्रशिक्षण संस्थांसाठी ‘आंतरराष्ट्रीय ग्रंथालय संघटना’ स्थापण्याचा दूरदर्शी प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे.
या मान्यतेमुळे आता देशोदेशीच्या फिल्म स्कूल्सला एकमेकांच्या ग्रंथालयांचा (फिल्म लायब्ररी) आणि माहितीस्त्रोतांचा उपयोग करता येणार आहे.
‘सिलेक्ट काँग्रेस’ म्हणून ओळखली जाणारी ही परिषद दरवर्षी निरनिराळ्या देशांत भरते. यंदा झुरिकला भारतातर्फे एफटीआयआय सहभागी झाली होती. एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला आणि संस्थेतील प्रा. मिलिंद दामले त्यात उपस्थित होते. सिलेक्ट काँग्रेसच्या सदस्य देशांतील फिल्म स्कूलच्या फिल्म लायब्ररी आता परस्परांशी जोडल्या जाणे शक्य होईल. त्यान्वये चित्रपट प्रशिक्षणाला नवनव्या वाटा मिळत उपयोग होणार आहे, असे कँथोला यांनी ‘मटा’ला सांगितले.
सुमारे वर्षभर यासाठी एफटीआयआयतर्फे प्रयत्न सुरू होते. संस्थेच्या मुख्य ग्रंथपाल अनुराधा वजिरे यांनी त्यासाठी विशेष मेहनत घेतली. या परिषदेदरम्यान इस्राईल, जर्मनी, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड अशा विविध देशांच्या फिल्म स्कूल्सशी चित्रपट शिक्षण आणि त्याबाबतच्या अभ्यासक्रम निर्मितीसंदर्भातील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एफटीआयआयतर्फे सखोल चर्चाही करण्यात आली. शिवाय, ‘स्टुडंट अँड टिचर एक्स्चेंज’ उपक्रमांवरही सकारात्मक चर्चा झाली.
…………..

Get 3% discount on your investment!
Ad: Fundsindia

How smart investors get value for money.
Ad: Icici Pru Life

Recommended By Colombia


परदेशांतही चित्रपट रसग्रहण कार्यशाळा
भारतीय सिनेमा आणि चित्रपट संगीत यांच्या रसग्रहणाची शिबिरे आता परदेशांतही अनुभवता येणार आहेत. झुरिकच्या परिषदेत अनेक परदेशी चित्रपट शिक्षण संस्थांनी यासाठी मान्यता दिली असून, त्यांच्या कॅम्पसमध्ये येत्या काळात एफटीआयआयच्या पुढाकाराने होणाऱ्या भारतीय चित्रपट रसग्रहण कार्यशाळा आयोजिल्या जाणार आहेत.
…………..
इस्राईलसोबत पहिल्यांदाच एकत्र
जेरुसलेमच्या (इस्राईल) दोन फिल्म स्कूल्सशी एफटीआयआयचे बोलणे झाले असून, लवकरच या दोन्ही संस्थांसोबत ‘स्टुडंट अँड टिचर एक्स्चेंज’ उपक्रम सुरू होणार आहेत. त्यातून पुणे आणि जेरुसलेम या ठिकाणी डॉक्युमेंटरी प्रकल्प करण्यात येतील. या निमित्ताने एफटीआयआय इस्राईलसोबत पहिल्यांदाच एकत्र येत आहे.