DTE Admissions 2019-20

DTE Admissions 2019-20

कृषी पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाइन प्रक्रिया आजपासून

PUBLISH DATE 11th June 2018

राज्यातील चार कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज, सोमवारी ११ जूनपासून सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज आणि त्या अर्जाला आवश्यक असणारी कागदपत्रे ५ जुलैपर्यंत वेबसाइटवर अपलोड करायची आहे, अशी माहिती महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी दिली आहे.

राज्यात चार कृषी विद्यापीठांशी संलग्न असलेल्या १८७ कॉलेजांतील दहा विद्याशाखांमध्ये पदवी अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. राज्य सरकारने बीएससी (ऑनर्स) (कृषी), बीएससी (ऑनर्स) (उद्यानविद्या), बीएससी (ऑनर्स)(वनविद्या), बी-टेक (कृषी अभियांत्रिकी), बी-टेक (अत्रतंत्रज्ञान), बीएससी (ऑनर्स)(सामाजिक विज्ञान), बी-टेक (जैवतंत्रज्ञान) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी यंदा प्रथमच एमएचटी सीईटी घेतली होती.

या परीक्षेतील गुणांच्या आधारे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या नियंत्रणाखाली (सीईटी सले) ११ जूनपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. तर, बीएफएससी (मत्स्यशास्त्र), बीएस्सी (ऑनर्स) (पशुसंवर्धन), बीएस्सी (ऑनर्स) (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे परिषदेने सांगितले. शासकीय कॉलेजांमध्ये प्रवेश क्षमतेतील पाच टक्के जागा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेसाठी; दोन टक्के जागा राज्याबाहेरील उमेदवारांसाठी राखीव ठेवल्या आहेत.

उर्वरित जागांच्या ३० टक्के जागा महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी आणि ७० टक्के जागा संबंधित कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून १२ विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी (कृषी विद्यापीठ कोटा) राखीव ठेवण्यात येणार आहे. कायमस्वरूपी विना अनुदानित कॉलेजांमध्ये २० टक्के जागा संस्थास्तरीय कोट्यासाठी राखीव ठेवून उर्वरित जागांपैकी ३० टक्के महाराष्ट्र कोटा आणि ७० टक्के कृषी विद्यापीठ कोटा, असे जागांचे वाटप राहणार आहे.

प्रवेश प्रक्रिया विषयक माहिती, कार्यपद्धती, आरक्षण इत्यादी सर्व बाबींचा समावेश असलेली प्रवेश माहिती पुस्तिका वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती http:/wwwdtemaharashtra.govin / http:Aww.mcaer.org / http:maha-agriadmission.in या वेबसाइटवर मिळेल.

प्रवेश प्रक्रियेला सुरुवात - ११ जून

ऑनलाइन अर्ज व कागदपत्रे स्कॅन करून वेबसाइटवर अपलोड करणे - ५ जुलै

विलंब शुल्क १००० रुपये भरून अर्ज दाखल करणे - ७ जुलै

गुणवत्ता यादी वेबसाइटवर प्रसिद्ध - १३ जुलै

यादीबाबत आक्षेप घेणे - १७ जुलै

अंतिम गुणवत्ता यादी वेबसाइटवर प्रसिद्ध - २३ जुलै

पहिली प्रवेश फेरीसाठी यादीची प्रसिद्धी - २६ जुलै

प्रवेश घेण्याची अंतिम तारीख - ३० जुलै

रिक्त जागांची प्रसिद्धी - ३१ जुलै

दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी यादीची प्रसिद्धी - ३ ऑगस्ट

प्रवेश घेण्याची अंतिम तारीख - ६ ऑगस्ट

रिक्त जागांची प्रसिद्धी - ७ ऑगस्ट

तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी यादीची प्रसिद्धी - ९ ऑगस्ट

प्रवेश घेण्याची अंतिम तारीख - १३ ऑगस्ट

रिक्त जागांची प्रसिद्धी - १४ ऑगस्ट

चौथ्या प्रवेश फेरीसाठी यादीची प्रसिद्धी - १६ ऑगस्ट

प्रवेश घेण्याची अंतिम तारीख - २० ऑगस्ट

जागेवरील प्रवेश फेरींसाठी रिक्त जागांची प्रसिद्धी - २२ ऑगस्ट

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेणे - २७ ते ३० ऑगस्ट

शैक्षोणिक वर्ष सुरू होणे - २७ ऑगस्ट

प्रवेशाचा अंतिम दिनांक - ३० सप्टेंबर

प्रवेश प्रक्रियेची माहिती

http:/wwwdtemaharashtra.gov.in

http:mcaer.org

http:maha-agriadmission.in

   

Image result for click here gifhttp://vidyarthimitra.org/rank_predictor

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------