Higher Education

Higher Education

पीएचडी प्रवेशाचीप्रक्रिया २०१९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

PUBLISH DATE 4th April 2019

पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएचडी मार्गदर्शकांकडील पीएचडीसाठी रिक्त जागांचा तपशील विद्यापीठाला उपलब्ध झाला आहे...

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएचडी मार्गदर्शकांकडील पीएचडीसाठी रिक्त जागांचा तपशील विद्यापीठाला उपलब्ध झाला आहे. हा तपशील लवकरच विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार असून त्याचबरोबर पीएचडीच्या प्रवेशप्रक्रियेचे कामकाजही सुरू होणार आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेशप्रक्रियेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पीएचडी प्रवेशप्रक्रिया राबवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाकडून पीएचडीसाठी मान्यता असलेल्या मार्गदर्शकांना त्यांच्याकडे असणाऱ्या रिक्त जागांची माहिती कळविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मार्गदर्शकांनी ही माहिती वेळेत उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आता मार्गदर्शकांकडे असलेल्या रिक्त जागांची माहिती विद्यापीठ प्रशासनाला मिळाली असून त्याची नोंद पूर्ण झाली आहे. 'येत्या सोमवारी किंवा मंगळवारी या जागांचा तपशील विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला जातील. तसेच पीएचडीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल,' अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली.

विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांमध्ये २०२१ सालापासून थेट सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू व्हायचे असल्यास नेट परीक्षेबरोबरच पीएचडीची पदवी अनिवार्य केली आहे. तर महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी पदव्युत्तर पदवीसोबत नेट किंवा पीएचडी अशी किमान पात्रता कायम ठेवली आहे. त्यामुळे राज्यातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारे असंख्य विद्यार्थी, महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणारे सहायक प्राध्यापक तसेच विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये अध्यापन करण्यासाठी इच्छुक असणारे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पदवीधारक अशा सर्वांनाच पीएचडी प्रवेशप्रक्रियेची उत्सुकता होती. रिक्त जागांचा तपशीलच उपलब्ध नसल्याने पीएचडीची प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होत होता. त्यामुळे पीएचडीची प्रवेशप्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित केला जात होता.

'पीएचडी प्रवेशासंदर्भातील नियोजन अंतिम टप्प्यात आहे. मार्गदर्शकांसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्वे संबंधितांना कळविण्यात आली आहेत. तसेच पीएचडीच्या प्रवेशासाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यंदा प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी रिक्त जागांचा तपशील विद्यापीठाच्या वेळापत्रक वेबसाइटवर टाकण्यात येईल; तसेच प्रवेशप्रक्रियेचे परिपत्रक जाहीर केले जाईल,' असे उत्तम चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Ph.D Circular 

MBA Admission Counselling & Assitance Call: 7720025900 or Email: info@VidyarthiMitra.org

Online Mock Exam: NEET JEE MHT CET 2019

Click to View| Upcoming Entrance Exams

India's Leading Educational Web Portal now available on Google play store                 https://goo.gl/HbsLr2
 

Check FYJC & ALL COURSES UNDER DTE & DMER - Previous & Current Year Cutoff |  http://vidyarthimitra.org/rank_predictor

OR

Download App Now : Cut-offs 2019

 

Also Read : List Of Foreign Medical Institutions/Universities For MBBS

 

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org