RTE Admissions

RTE Admissions

‘आरटीई’ प्रवेश १०० टक्के होणार

PUBLISH DATE 19th May 2018

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश घेण्यासाठी एससी, एसटी प्रवर्गातसोबतच व्हीजे (अ), एनटी (ब), एनटी (क), एनटी (ड), एसबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील मुलांना पालकांच्या उत्पन्नाची अट लागणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता 'आरटीई'अंतर्गत १०० टक्के प्रवेश होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेशासाठी राज्यात चुरस निर्माण होणार आहे.

शिक्षण विभागाने व्हीजे, एनटी, एसबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील मुलांना 'आरटीई' अंतर्गत खासगी शाळेतील राखीव जागांवर प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या एक लाख उत्पन्नाची अट लागणार नसल्याचा निर्णय गुरुवारी घेतला. यापूर्वी केवळ एससी आणि एसटी प्रवर्गातील मुलांना प्रवेशासाठी ही अट लागू होती. तर, खुल्या प्रवर्गासोबतच इतर राखीव प्रवर्गातील मुलांना आरटीईतून शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या एक लाख उत्पन्नाची अट होती. त्यामुळे या प्रवर्गातून ठरावीक पालकांना मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची संधी मिळत होती. मात्र, आता राखीव प्रवर्गातील उत्पन्नाची अट काढून टाकल्याने प्रवर्गातील सर्वांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. तर, निर्णयानुसार एचआयव्ही बाधित बालकांना देखील प्रवेशासासाठी उत्पन्नाची अट लागणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. दर वर्षी प्रवेशासाठी उपलब्ध जागांवर साधारण ६० टक्के प्रवेश होतात. मात्र, या निर्णयामुळे आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध असणाऱ्या संपूर्ण जागांवर प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता १०० टक्के प्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आरटीईचे प्रवेश हे ऑनलाइन लॉटरी पद्धतीने काढण्यात येतात. त्यामुळे प्रवेशासाठी उपलब्ध जागा आणि अर्जांची संख्या लक्षात घेतल्यास राखीव प्रवर्गातीत अनेक गरजू मुले प्रवेश मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात पुणे, औरंगाबाद आणि काही जिल्ह्यांमध्ये प्रवेशाची दुसरी लॉटरी काढण्यात आलेली नाही. साधारण २१ मेनंतर ही लॉटरी काढण्यात येईल.

चुरस वाढणार

सध्या सुरू असलेल्या 'आरटीई' प्रवेश प्रक्रियेत राज्यातील खासगी शाळांमध्ये एक लाख २६ हजार ११७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहे. या जागांवर मुलांच्या प्रवेशासाठी साधारण एक लाख ८८ हजार पालकांनी नोंदणी केली आहे. तर, त्यापैकी दोन फेऱ्यांमधून ४९ हजार ३१८ मुलांना प्रवेश मिळाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये 'आरटीई' प्रवेश प्रक्रियेत उपलब्ध जागांच्या एकूण ६० टक्के प्रवेश होतात. मात्र, यंदापासून ही प्रवेशाची टक्केवारी वाढणार आहे. तर, पुढच्या वर्षी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत अर्ज करणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात जाणार असून, प्रवेशासाठी चुरस निर्माण होणार आहे. तसेच, राज्यातील शाळांमध्ये उपलब्ध असणाऱ्या संपूर्ण जागांवर प्रवेश होण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे.

Click here Details of All  : Entrance Exams 2018

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------