महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (महाटीईटी-२०१९ ) वेळापत्रक प्रसिध्द झाले असून येत्या १९ जानेवारी २०२० रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना येत्या ८ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहेत, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया काही वर्षांपासून रखडली होती. परिणामी डी.एड्., बी.एड्.पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे ९० टक्क्यांनी घट झाली. तसेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमीच होती.मात्र,चालू शैक्षणिक वर्षात राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुमारे ५ हजार शिक्षकांची भरती केली.भरती प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शास्वती वाटू लागली आहे.यामुळे यंदा टीईटी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल,अशी शक्यता परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दत्तात्रय जगताप म्हणाले,इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापन,सर्व परीक्षा मंडळ ,सर्व माध्यम ,अनुदानित,विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेतर्फे जानेवारी २०२० मध्ये घेतल्या जाणा-या परीक्षेसाठी ८ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांकडून नलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.तसेच १९ जानेवारी रोजी सकाळीच्या सत्रात व दुपारच्या सत्रात टीईटी परीक्षेचा पहिला व दुसरा पेपर घेतला जाईल.
--------------
मागील टीईटी परीक्षेस १ लाख ७३ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. मात्र, यंदा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू झाली. त्यामुळे टीईटी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल.जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षेस सुमारे अडीच लाखापर्यंत विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे.
- दत्तात्रय जगताप,अध्यक्ष,परीक्षा परिषद,महाराष्ट्र राज्य
अ.क्र. | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
---|---|---|
१ | ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी | ०८/११/२०१९ ते २८/११ /२०१९ |
२ | प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. | ०४/०१/२०२० ते १९/०१/२०२० |
३ | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक व वेळ | १९/०१/२०२० वेळ स. १०.३० ते दु.१३.०० |
४ | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - II दिनांक व वेळ | १९/०१/२०२० वेळ दु. १४.०० ते सायं. १६.३० |
परीक्षा शुल्क
प्रवर्ग | फक्त पेपर - १ किंवा फक्त पेपर - २ | पेपर - १ व पेपर - २ (दोन्ही) |
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. | रू. ५००/- | रू. ८००/- |
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग (Differently abled person) |
रू. २५०/- | रू. ४००/- |
सूचना :
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना
खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.
१. ऑनलाईन नोंदणी.
२. पोर्टल लॉगिन.
३. आवेदनपत्र भरणे.
४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.
५. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे.
६. आवेदनपत्राची प्रिंट घेणे.
१. ऑनलाईन नोंदणी
अर्ज भरण्याविषयीच्या सूचना www.mahatet.in या संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'महाटीईटी-२०१९ उपक्रम' मधील 'नवीन नोंदणी करा' या Tab वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील अर्ज भरण्याविषयीच्या सूचना काळजीपूर्वक वाचून पानाच्या शेवटी असलेल्या
" मी वरील सर्व सूचनांचे वाचन केले आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा -२०१९ साठी अर्ज भरू इच्छितो" या पर्यायासमोरील चेकबॉक्स सिलेक्ट करा, नोंदणी फॉर्म भरण्यासाठी "नवीन नोंदणी" या बटनावर क्लिक करा.
नवीन नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.
अर्जदाराचे प्रथम नाव / वडिलांचे नाव / आडनाव / जन्म दिनांक (एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे) / लिंग / मोबाईल क्रमांक / ईमेल आयडी
वरील माहिती अचूक भरून झाल्यावर "Submit" या बटनावर क्लिक करा. नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वरच सदर परीक्षार्थीचा TET रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड पाठविला जाईल.
नोंदणीकृत केलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी या परीक्षेसाठी पुनर्नोंदणीसाठी वापरता येणार नाही.
२. पोर्टल लॉगिन
www.mahatet.in या संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'महाटीईटी-२०१९ उपक्रम' मधील 'लॉगिन' या Tab वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील उजव्या बाजूस असलेल्या रकान्यात आपला TET रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड भरून "Submit" या बटनावर क्लीक करा. पासवर्ड विसरला असल्यास "फॉरगॉट पासवर्ड" या पर्यायाचा वापर करा.
३. आवेदनपत्र भरणे
प्राप्त झालेल्या TET रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड द्वारे Login करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर जा, लॉगिन केल्यानंतर आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.
i) अर्जदाराविषयी माहिती -
ii) अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती -
iii) अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग आणि इतर माहिती -
iv) अर्जाचा स्तर (पेपर I / पेपर II) -
v) परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयी माहिती -
vi) शैक्षणिक पात्रता -
vii) व्यावसायिक पात्रता -
viii) छायाचित्र ओळख -
४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे
भरलेल्या अर्जातील माहिती पाहण्यासाठी Preview या टॅब वर क्लिक करा. स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.
माहितीत बदल करावयाचा असल्यास स्क्रिनच्या शेवटी असलेल्या "Edit " बटनावर क्लिक करून आवश्यक ते बदल करा आणि पुन्हा Preview या बटनावर वर क्लिक करून स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करून "Submit " या बटनावर क्लिक करा.
अर्जदाराने ऑनलाईन परीक्षा शुल्क यशस्वीरीत्या भरल्यानंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. तसेच त्यानंतर अर्जामधील माहिती बदलाबाबत कोणतेही निवेदन/अर्ज यांचा विचार केला जाणार नाही.
५. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे
सर्व माहिती अचूक भरून झाल्यावर "Payment" या Tab वर क्लिक करा, स्क्रीनवर आलेली परीक्षा शुल्क संदर्भातील माहिती अचूक असल्याची खात्री करा.
Make Payment या बटनावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व एटीएम पीन, इंटरनेट बँकिंग, Wallet / कॅश कार्ड असे पर्याय उपलब्ध होतील. आपणास सोयीस्कर असलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे.
चलनाद्वारे / ऑफलाइन शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध नाही.
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरतेवेळी इंटरनेट कनेक्शन नसणे, वीज पुरवठा खंडित होणे यामुळे परीक्षा शुल्क जमा न झाल्यास पुन्हा Login करून परीक्षा शुल्क ऑनलाईन भरावे.
परीक्षा शुल्क जमा झाल्यास स्क्रीनवर Payment Successful असा मेसेज येईल आणि ‘ Transaction Details’ / Transaction Receipt स्क्रीनवर दिसेल.
Payment History या टॅब वर क्लिक करून अर्जदारास सदर Transaction Receipt पाहता व प्रिंट घेता येतील.
६. आवेदनपत्राची प्रिंट घेणे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता " Preview / Print " या टॅब चा वापर करावा.
आवेदनपत्राची प्रिंट गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी यांचेकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.
प्रवाह चित्र
१) www.mahatet.in संकेतस्थळावर भेट देणे.
२) संकेतस्थळावरील MAHATET परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती, शासन निर्णय व परिपत्रके, परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षेस प्रविष्ट होण्याच्या अटी व शर्ती, आवश्यक प्रमाणपत्रे, परीक्षा शुल्क व इतर माहितीचे बारकाईने वाचन करावे.
३) सर्व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच होमपेज वरील “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.
४) नोंदणी विषयी सूचना काळजीपूर्वक वाचून सूचनांच्या तळाशी असलेले चेकबॉक्स (Checkbox ) वर क्लिक केल्यानंतरच “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.
५) उघडलेल्या ऑनलाईन नोंदणी अर्जात दर्शवलेली माहिती प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक (एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे), लिंग, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अचूकपणे भरा.
६) नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील TET Resgistration ID व Password द्वारे Login करा.
७) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात दर्शविलेली माहिती अचूकपणे भरा, तसेच आपला नवीनतम फोटो आणि स्वाक्षरीची इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे भरल्यानंतर "Save & Preview" या बटनावर क्लीक करा.
८) भरलेल्या अर्जातील माहिती पाहण्यासाठी Preview या बटनावर वर क्लिक करा. स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.
९) Preview मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून बदल करू शकता. भरलेल्या माहितीची खात्री झाल्यास सबमिट (Submit ) या बटनावर क्लिक करा. (शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.)
१०) PAYMENT च्या पेज वर गेल्यानंतर MAKE PAYMENT या बटणाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट/ डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)
११) शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता Preview / Print या टॅब चा वापर करावा. तसेच Transaction History या टॅब वर क्लिक करून झालेल्या Transaction ची माहिती पाहता येइल.
१२) आवेदनपत्राची एक प्रत तुमच्या माहितीसाठी स्वतःजवळ जतन करून ठेवावी.
अर्हता
“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ च्या तरतूदी लक्षात घेता, राज्यामध्ये इथून पुढे सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी (इयत्ता १ ली ते ८ वी करिता) खालीलप्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात येत आहे.
१.१) इयत्ता पहिली ते पाचवीकरिता:-
अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता-
(i) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका (D.T.ED) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो)
किंवा
(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यता प्राप्त मंडळाची किमान ४५ टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो).
किंवा
(iii) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची, चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण
किंवा
(iv) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयात दोन वर्षाची पदविका (विशे शिक्षण)
किंवा
(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो),
(vi) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्रमांक टसीएम-२००९/३६/०९/माश-४, दि. १० जून, २०१० अन्वये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (MCVC) शाखेअंतर्गत कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैद्दकिय सेवागटातील Crench and Pre School Management परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची शिक्षण शास्त्रात दोन वर्षाची पदविका
ब) शिक्षक पात्रता परीक्षा ( MAHATET)
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण.
१.२) इयत्ता ६ वी ते ८ वी करिता-
अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता-
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो)
किंवा
(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान ४५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी (Bachelor in Education) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो)
किंवा
(iii) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण
किंवा
(iv) मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed. उत्तीर्ण
किंवा
(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची एक वर्षाची B.Ed. (Special Education) पदवी उत्तीर्ण.
किंवा
(vi) कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैद्यकीय सेवा गटातील Crench and Pre School Management मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षणशास्त्रातील एक वर्षाची पदवी.
आणि
ब) शिक्षक पात्रता परीक्षा (T.E.T)
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण.
विद्यार्थी मित्र लवकरच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सराव परीक्षा घेणार आहे.
नाव नोंदणी करिता TET MOCK EXAM REGISTRATION
Click here Details of All : Entrance Exams 2018
| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)
पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)
१) भाषा-१ व २) भाषा-२
या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.
भाषा-१ | मराठी | इंग्रजी | उर्दु | बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी |
भाषा-२ | इंग्रजी | मराठी | मराठी किंवा इंग्रजी | मराठी किंवा इंग्रजी |
इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील
३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.
४) गणित :-
गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.
५) परिसर अभ्यास :-
परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.
काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.
संदर्भ :-
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके
पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)
१) भाषा-१ व २) भाषा-२
पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-
या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.
भाषा-१ | मराठी | इंग्रजी | उर्दु | बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी |
भाषा-२ | इंग्रजी | मराठी | मराठी किंवा इंग्रजी | मराठी किंवा इंग्रजी |
इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.
३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.
४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-
गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.
४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-
सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.
काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.
संदर्भ :-
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम
प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके
प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरूप
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.
पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)
एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे
अ.क्र. | विषय (सर्व विषय अनिवार्य) | गुण | प्रश्न संख्या | प्रश्न स्वरुप |
१ | बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र | ३० | ३० | बहुपर्यायी |
२ | भाषा-१ | ३० | ३० | बहुपर्यायी |
३ | भाषा-२ | ३० | ३० | बहुपर्यायी |
४ | गणित | ३० | ३० | बहुपर्यायी |
५ | परिसर अभ्यास | ३० | ३० | बहुपर्यायी |
एकूण | १५० | १५० |
पेपर(१) (इ. १ ली ते इ. ५ वी)
अ. क्र. | माध्यम | पेपर सांकेतांक | विभाग १ | विभाग २ | विभाग ३ | विभाग ४ | विभाग ५ |
भाषा (३० गुण) | भाषा (३० गुण) | बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण) | गणित (३० गुण) | परिसर अभ्यास (३० गुण) | |||
प्रश्न क्र.१ ते ३० | प्रश्न क्र.३१ ते ६० | प्रश्न क्र.६१ ते ९० | प्रश्न क्र.९१ ते १२० | प्रश्न क्र.१२१ ते १५० | |||
१ | मराठी | १०१ | इंग्रजी | मराठी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
२ | इंग्रजी | २०१ | इंग्रजी | मराठी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
३ | उर्दु | ३०१ | इंग्रजी किंवा मराठी | उर्दु | उर्दु व इंग्रजी | उर्दु व इंग्रजी | उर्दु व इंग्रजी |
४ | हिंदी | ४०१ | इंग्रजी किंवा मराठी | हिंदी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
५ | बंगाली | ५०१ | इंग्रजी किंवा मराठी | बंगाली | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
६ | कन्नड | ६०१ | इंग्रजी किंवा मराठी | कन्नड | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
७ | तेलुगु | ७०१ | इंग्रजी किंवा मराठी | तेलुगु | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
८ | गुजराती | ८०१ | इंग्रजी किंवा मराठी | गुजराती | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
९ | सिंधी | ९०१ | इंग्रजी किंवा मराठी | सिंधी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)
एकूण गुण १५०
कालावधी-२ तास ३० मिनिटे
अ.क्र. | विषय (सर्व विषय अनिवार्य) | गुण | प्रश्न संख्या | प्रश्न स्वरुप |
१ | बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र | ३० | ३० | बहुपर्यायी |
२ | भाषा-१ | ३० | ३० | बहुपर्यायी |
३ | भाषा-२ | ३० | ३० | बहुपर्यायी |
४ | अ) गणित व विज्ञान किंवा ब) सामाजिक शास्त्रे (Social Studies) |
६० | ६० | बहुपर्यायी |
एकूण | १५० | १५० |
पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी)
अ. क्र. | माध्यम | पेपर सांकेतांक | विभाग १ | विभाग २ | विभाग ३ | विभाग ४ | |
भाषा (३० गुण) | भाषा (३० गुण) | बालमानसशास्र व अध्यापनशास्र (३० गुण) | गणित व विज्ञान (६० गुण) | सामाजिक शास्र (६० गुण) | |||
प्रश्न क्र.१ ते ३० | प्रश्न क्र.३१ ते ६० | प्रश्न क्र.६१ ते ९० | प्रश्न क्र.९१ ते १५० | प्रश्न क्र.९१ ते १५० | |||
१ | मराठी | १०२ | इंग्रजी | मराठी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
२ | इंग्रजी | २०२ | इंग्रजी | मराठी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
३ | उर्दु | ३०२ | इंग्रजी किंवा मराठी | उर्दु | उर्दु व इंग्रजी | उर्दु व इंग्रजी | उर्दु व इंग्रजी |
४ | हिंदी | ४०२ | इंग्रजी किंवा मराठी | हिंदी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
५ | बंगाली | ५०२ | इंग्रजी किंवा मराठी | बंगाली | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
६ | कन्नड | ६०२ | इंग्रजी किंवा मराठी | कन्नड | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
७ | तेलुगु | ७०२ | इंग्रजी किंवा मराठी | तेलुगु | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
८ | गुजराती | ८०२ | इंग्रजी किंवा मराठी | गुजराती | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
९ | सिंधी | ९०२ | इंग्रजी किंवा मराठी | सिंधी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी | मराठी व इंग्रजी |
पेपर II मधील अ.क्र १ ते ३ विषय अनिवार्य आहेत. गणित व विज्ञान शिक्षकांसाठी विषय ४ मधील “अ” आणि सामाजिक शास्त्र शिक्षकांसाठी विषय ४ मधील “ब” व इतर शिक्षकांसाठी विषय क्र ४ मधील “अ” किंवा “ब” पैकी कोणताही एक विषय निवडता येईल.
Application Start Date | : | 8th November 2019 |
---|---|---|
Application End Date | : | 28th November 2019 |
Exam Date | : | 19th January 2020 |
Result Date | : | |
Conducted By | : | Maharashtra State Council Of Examination,Pune |
Official Website | : | https://mahatet.in |