Higher Education

Higher Education

इग्नू विद्यापीठातर्फे मास्टर ऑफ आर्ट्स इन ड्रॉइंग अॅण्ड पेंटिंग्स पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु २०२१

PUBLISH DATE 8th July 2021

स्कूल ऑफ परफॉर्मिंग अॅण्ड व्हिज्युअल आर्ट्स (SOPVA), इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठने मास्टर ऑफ आर्ट्स इन ड्रॉइंग अॅण्ड पेंटिंग्स (MADP)अभ्यासक्रम सुरु केला आहे. जुलै २०२१ पासून हा अभ्यासक्रम सुरु होणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांकडे पारंपारिक प्रणालीच्या माध्यमातून ललित कलेचा अभ्यास पोहोचला नाही त्यांना शिक्षण देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश असल्याचे विद्यापीठाने सांगितले.

हा अभ्यासक्रम उच्च शिक्षण घेणाऱ्या ललित कला विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केला गेलाय आणि यामध्ये कलेचे तत्व आणि सिद्धांत, कलेचा इतिहास, कला, शिक्षण, सौंदर्यशास्त्र सिद्धांतासारख्या मुख्य घटकांचा समावेश आहे.

नियोजित, स्वनियोजित, फ्रीलान्सर, डिझायनर, चित्रकार, शाळा आणि कॉलेजचे शिक्षकांना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार असल्याचेही विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. इग्नूच्या वेबसाइटवर यासंदर्भातील अधिक माहिती देण्यात आली आहे. याची लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

कलेमध्ये पदवीचे शिक्षण घेण्यासोबतच विद्यार्थी ड्रॉइंग आणि पेंटिंग, ललिक कला, दृश्य कला, अॅनिमेशन, डिझाइन, फॅशन, औद्योगिक, कपडा या संबंधित विषयात पदवी मिळवता येऊ शकते. यासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात.

अभ्यासक्रमाची भाषा
मास्टर ऑफ आर्ट्स इन ड्रॉइंग अॅण्ड पेंटिंग्स या अभ्यासक्रमाचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून असणार आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये आपली असाइनमेंट आणि परीक्षा पूर्ण करण्याची परवानगी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.

अभ्यासक्रमाचा कालावधी
मास्टर ऑफ आर्ट्स इन ड्रॉइंग अॅण्ड पेंटिंग्स या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असणार आहे. याचे शुल्क १६,५०० रुपये आहे. विद्यार्थ्यांना ही रक्कम दोन टप्प्यात भरावी लागणार आहे. विद्यार्थी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये प्रतिवर्ष ८,२५० रुपये भरु शकतो.

इग्नूच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा

-----------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org Free Online Mock Test For 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.