Jobs

Jobs

एसएससी जीडी कांस्टेबल भरती परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर २०२१

PUBLISH DATE 19th July 2021

प्रदीर्घ काळापासून एसएससी जीडी कांस्टेबल भरती परीक्षेच्या नोटिफिकेशनची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे.

कर्मचारी निवड आयोगाने जीडी कॉंस्टेबलच्या एकूण २५ हजारहून अधिक पदांवरील भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. नोटिफिकेश २०२१ नुसार केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), एनआयए, एसएसएफमध्ये कॉंस्टेबल पदाच्या एकूण २५ हजार २७१ जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर माहिती मिळू शकते. पूर्ण फॉर्म काळजीपूर्वक वाचून अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे. तसेच ऑनलाइन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर आणि चलान फी जमा करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर आहे.

जीडी कॉन्स्टेबल पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी परीक्षा पास असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांकडे पात्रता प्रमाणपत्र आहे किंवा जे १ ऑगस्ट २०२१ च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत तेच उमेदवार अर्ज करु शकतात. एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा २०२१ ची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. तर निवड केल्या गेलेल्या उमेदवारांना पे लेव्हल ३ प्रमाणे २१, ७०० ते ६९,१०० पर्यंत पगार देण्यात येणार आहे.

SSC GD 2021 Notification: महत्वाच्या तारखा

  1. ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख- १७ जुलै २०२१
  2. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख- ३१ ऑगस्ट २०२१
  3. ऑनलाईन फीस जमा करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२१
  4. ऑफलाइन चलान जनरेट करण्याची शेवटची तारीख- ४ सप्टेंबर २०२१
  5. ऑफलाइन चलानद्वारे शुल्क भरण्याची तारीख- ७ सप्टेंबर २०२१

वयोमर्यादा
जीडी कँस्टेबल भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. १ ऑगस्ट २०२१ ही वयोमर्यादेची कटऑफ आहे. याशिवाय आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा

-----------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org Free Online Mock Test For 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.