Higher Education

Higher Education

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑगस्टपासून सुरू होणार २०२१

PUBLISH DATE 19th July 2021

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत (YCMOU) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या उन्हाळी परीक्षा १० ऑगस्टपासून (Final year exams)सुरू होणार असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन पद्धतीने त्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कृषी अभ्यासक्रमांच्या परीक्षा मात्र विद्यापीठामार्फत २३ जुलैपासून घेतल्या जाणार आहेत. करोना प्रादुर्भावामुळे मुक्त विद्यापीठामार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जानेवारी महिन्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती.

तसेच अभ्यास केंद्रे बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. या सगळ्यांमुळे दरवर्षी मे महिन्यात होणाऱ्या या परीक्षा यंदा ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात आल्या असून, १० ऑगस्टपासून विद्यापीठामार्फत राबवल्या जाणाऱ्या १८१ अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यापूर्वी विद्यापीठाच्या १६ कृषी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २३ जुलैपासून आयोजित केल्या जाणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाइन परीक्षा होणार असून, विद्यार्थ्यांना कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल, टॅब या माध्यमातून ती देता येणार आहे. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेले जवळपास साडेसहा लाख विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. बी. पी. पाटील यांनी दिली. दिवसभरात पाच तासांच्या तीन सत्रांत ही ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

या पाच तासांत विद्यार्थ्याला कधीही लॉगइन करता येणार आहे. लॉगइन केल्यापासून एक तासाच्या आता पेपर जमा करावा लागणार आहे. बहुपर्यायी स्वरुपाचे ५० प्रश्न विद्यार्थ्यांना या परीक्षेत विचारले जाणार आहेत. त्यापैकी ६० गुणांसाठी ३० प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावी लागणार असून, प्रत्येक उत्तराला दोन गुण दिले जाणार आहेत. परीक्षेनंतर ३० दिवसांत निकाल जाहीर केला जाणार असल्याचे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org Free Online Mock Test For 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.